१ एप्रिल १६७३
मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला. पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड. सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख. पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती. म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग. मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला. मग शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड. मग औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले ‘नवरसतारा’. पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा ‘सज्जनगड’ म्हणून नामकरण विधी केला.
२ एप्रिल १६७९
दिलेरखान व संभाजी राजांचा भूपालगडावर कब्जा. ७०० मराठ्यांचे हात तुटले. भूपालगड. हा गड सातारा – मिरज परिसरात आहे. सातार्याहून मायणीस जावे. मायणीस येऊन ‘विटे’ येथे जावे. खानापूरमार्गे जतकडे जाणार्या एस टीने पळशीस उतरावे. पूर्वेला कोळदुर्ग ते भूपालगड डोंगररांग आहे. स्वरूप पठारीच आहे. शंभू महादेव रांगेत सीताबाई डोंगरातून निघालेल्या डोंगरातून धावणार्या महिमान फाट्यावर हा भूपालगड आहे. ही रांग पूर्वेला माणगंगा आणी पश्चिमेला येरळा खोरे विभागते. संभाजी राजे या कालखंडात दिलेरखानास मिळाले होते. इतिहासाचा हा एक दुर्दैवी अध्याय आहे. इतिहास हा कधी कधी कडू असतो. त्यातीलच हे एक पान. असे का घडले असावे याचे अनेक तर्क बांधता येतील. पण ते हे स्थळ नव्हे ! भूपालगडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. संभाजी राज्यांविरूद्ध त्यांनी तलवार उचलली नाही. गड संभाजीराजे व दिलेरखानाच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली. तसेच गडा-गडांवर निरोप धाडले की संभाजी राजे जातीने आले तरी तरवार चालवणे. गड ताब्यात न देणे. अखेर शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड बुद्धीकौशल्याच्या बळावर संभाजी राजांना पुन्हा रायगडावर बोलावून घेण्यात यश मिळवले व त्यांची समजूत काढली. मग मात्र संभाजी राजांचे डोळे उघडले व अशी चूक पून्हा त्यांनी कधीही केली नाही.
३ एप्रिल १६६२
मोरोपंत पिंगळे हे आतापर्यंत मुजुमदारी करीत होते. त्यांची ही मुजुमदारी निळोपंत सोनदेवांस दिली. शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पेशवे पद दिले.
३ एप्रिल १६६७
आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.
४ एप्रिल १६७०
नगर मध्ये मराठे घुसलेले पाहून दाऊदखान कुरेशी हा खानदेशातून त्वरेने अहंमदनगरास ७००० स्वारांसह आलेला होता. मग नगर मध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊद खान त्यांच्या मागे हात धूऊन पळत सुटला. जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पूरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला. पुढे दाउद खान नगरहून औरंगाबादेस गेला आणि मराठे पुन्हा नगरमध्ये घुसले व त्यांनी तेथील ५१ गावे लुटली.
६ एप्रिल १६६३, मध्यरात्री १२ नंतर
महाराजांनी छापा घालून शाईस्तेखानाला उडवायचा मनसुबा आखला. छाप्यासाठी मुहुर्त निवडला चैत्र शुद्ध अष्टमीच्या ढळत्या मध्यरात्रीचा. ऐन मध्यरात्र. सारी छावणी सूस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला. महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले.
८ एप्रिल १६५७
२७ वर्षीय शिवाजीराजे यांचा जाधवरावांच्या काशीबाई यांच्याशी विवाह.
८ एप्रिल १६६३
नबाब शाईस्तेखान पुणे सोडून औरंगाबादला बोंबलत गेला.
८ एप्रिल १६७४
चिपळूण येथे शिवाजी महाराजांनी लष्कराची पाहणी केली.
राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे सरनौबत पद हंभिरराव मोहिते यांस बहाल.
९ एप्रिल १६६९
सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन-दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला या पाशवी हुकुमानेछ जणू निसर्ग थरारला होता
९ एप्रिल १६७० रोजी औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा ही ९ एप्रिल १६७० ला वारली .
९ एप्रिल पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तशामखान हा मेला;यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली.
१० एप्रिल १६६०
राजापूरचा प्रसंग विसरून इंग्रज पन्हाळ्याच्या वेढ्यात मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात ब्रिटिश निशाण उभारून स्वतःच्या तोफा डागायला सुरूवात केली.
१३ एप्रिल १६६३
नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले. ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले.
१४ एप्रिल १६६४
जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली.
१४ एप्रिल १६६५
मोगलांनी फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड जिंकला. हा किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे.
१५ एप्रिल १६७३
प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले.
१६ एप्रिल १६४०
शके १५६२ विक्रमनाम संवत्सरी वैशाख शुद्ध पंचमीस म्हणजे गुरुवार दि. १६ एप्रिल १६४० रोजी निंबाळकर पवार घराण्याच्या सईबाईंशी शिवाजी महाराजांचे पहिले लग्न झाले
१८ एप्रिल १६७७
त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन
२० एप्रिल १६६५ ची रात्र
शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळी पुरंदर मिर्झा राजे जयसिंह व दिलेर खान पठाण या दैत्यांशी झुंजत होता. कशी कुणास ठाऊक ? पण केदार दरवाज्याने ही कुमक गडावर पोचली.
२३ एप्रिल १६५७
रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.
२४ एप्रिल १६७४
शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता शिवरायांचा दोन महिन्यांनी राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण महाराजांनी तसे केले नाही व जिजाबाई साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले.
२९ एप्रिल १६६१
शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली.
३० एप्रिल १६५७
शिवाजी महाराजांनी जुन्नर हे मोगली ठाणे लुटले. काही दिवसांपूर्वीच शिवाजी राजांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते. औरंगजेबानेही महाराजांना आपला “प्रेमाचा” खलीता पाठविलेला होता. त्या खलित्यात शिवाजी महाराजांनी “मोगलांचे अधिकारी” या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती. या संमती पत्राची तारीख आहे २३ एप्रिल १६५७. जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहाजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवाजी नक्की दिल्ली दरबाराचा निष्ठावान झाला. पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयाची खंडणी गोळा केली. दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही.

No comments:
Post a Comment