१ फेब्रुवारी १६८९ मराठा इतिहासातील अत्यंत काळा दिवस ‘छत्रपति संभाजी महाराज’ मुघलांच्या तावडीत … !
२ फेब्रुवारी १६६१
शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला ‘सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -’ असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे ‘तुंगारण्य’. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती – २ फेब्रुवारी १६६१. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.
४ फेब्रुवारी १६६०
कोकणातील दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले
४ फेब्रुवारी १६७५
शिवाजी महाराजांनी संभाजी राजांची रायगडावर मुंज पार पाडली.
५ फेब्रुवारी ते १० मार्च १६७७
शिवाजी महाराजांचे भागानगर (हैद्राबाद) येथे आगमन. शिवाजी महाराजांची व कुतुबशाहाची भेट. एक महिना मुक्काम. (दक्षिण दिग्विजय प्रसंग)
माघ शुद्ध नवमी – दासबोध जयंती
माघ शुद्ध नवमी हा पवित्र दिवस आम्हाला खूप मोठी आणि शाश्वत देणगी देऊन गेला. आजच्या दिवशी समर्थ रामदासांनी शिष्योत्तम कल्याण स्वामींच्या शूभ हस्ते दास बोध लिखाणाचे काम पूर्ण केले. त्यामूळे हा दिवस दास बोध जयंती म्हणून ओळखला जातो. हे लिखाणाचे सत्कार्य शिवथर घळीत पूर्ण झाले. त्याची तेजस्वी आठवण म्हणून शिवथर घळीत दास बोध जयंती उत्सव दर वर्षी थाटामाटात साजरा केला जातो.
७ फेब्रुवारी १६९८
झुल्फिकार खानच्या ताब्यात जिंजी किल्ला आला.छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी जिंजीस वेढा दिला होता.
८ फेब १६६५
शिवाजी महाराजांनी पहिलीच आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बसनूर (वसुपूर)(कर्नाटक)या श्रीमंत शहराच्या रोखणे निघाली. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती.म्हणजे राजांची पहिलीच मोठी सागरी स्वारी.
८ फेब्रुवारी माघ वद्य नवमी (दास नवमी)
उमरठ्याचे तानाजी राव मालुसरे सुभेदार म्हणजे एक बडे प्रस्थ. शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा मैतर. तानाजीरावांचे वर्णन करावे ते शाहिरांनीच ! इतरांना नाही साधायचे ते. सेवाचाकरीत अट नाही आणी निष्ठेत कधी फट नाही. सुभेदारांचा दरारा जगात राजगडावरील बालेकिल्ल्याइतकाच भारदस्त होता. मुलाचे लगीन ठरवल्यानिमित्त राजास निमंत्रण देण्यास गेलेल्या रावांनी राजाची बेचैनी ओळखली. आउसाहेबांचे मनोगत ताडले आणि सिंहगडाच्या लगीनघाईचा मान आपल्या ताब्यात घेतला. रावांचा डाव म्हणजे अस्सल हनुमंती डाव. घाल झडप की कर गडप. फुकटची मोगली मिजास दिसणार नाही त्यात. तानाजी रावांनी निवडली रात्र माघ वद्य नवमीची (दि.०४ फेब्रुवारी १६७०) !!! सिंहगडाच्या पश्चिमेकडील डोणागिरीच्या कड्याजवळ तानाजी राव ससैन्य प्रगटले. दोघे जण सरसर करीत तो बेताल डोणागिरीचा कडा “जैसे वानर चढोन जाताती” तसे चढून गेले. वर जाऊन त्यांनी दोर सोडले. स्वतः तानाजी राव फौजेसह गडावर दाखल झाले. इतक्यात उदयभान राठोड या मोगली किल्लेदाराच्या पहारेकर्यांनी हा हल्ला हेरला. गडावर एकदम हलकल्लोळ उडाला. तानाजी रावांनी गडावर जीव खाऊन कापणी चालवली. त्यांना ठावकी होते, की हा हल्ला फसला तर पुन्हा कधीही गडावर भगवा झेंडा लागू शकणार नाही. गडावर लगीन घाई उडाली. हिलालांच्या अक्षता उडू लागल्या. मशालींच्या पदन्यासात सिंहगड डोलू लागला. राजगडावरून ही सिंहगडावरची धांदल महाराज डोळ्यांत जीव ओतून बघत होते. आता मध्य रात्र उलटून गेली होती. चंद्र आस्मानी उगवला होता. अन् उदयभान व तानाजी राव अचानक एकमेकांसमोर आले. दोघेही कमालीचे शूर. एकाच्या अंगी इंद्राच्या ऐरावताचे बळ होते, तर एकाच्या अंगी यमराजाच्या रेड्याचे बळ होते. दात खाऊन दोघेही रणास पेटले. चित्यांसारख्या झेपा टाकून एकमेकाला ठार करण्याचा यत्न करू लागले. अन् घात झाला. तानाजी रावांची ढाल तूटली. समयास दूसरी ढाल मिळाली नाही. कुठून येणार ? तानाजी रावांनी आपले भवितव्य ओळखले. त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडासे काढून ढाली सारखे धरले. व त्यावर घाव झेलू लागले. उदयभान चेकाळून उन्मादाने सुभेदारांवर वेगात घाव घालू लागला. घनगर्जन धडधडधडते, धुरा घालिती भरडत चिरडत. आणि उदयभानचा एक घाव खाडकन तानाजी रावांवर पडला. मरता मरता सुभेदारांनिही आपल्या ठेवणीतला एक अवघड वार वैर्यावर घातला. दोघेही धाडकन जमिनीवर पडले व गतप्राण झाले.
मराठ्यांमध्ये हाकाटी पेटली, “सुभेदार पडले, सुभेदार पडले” अन् मराठे रण सोडून पळत सुटले. सुर्याजीने ते पाहिले अन् त्याचे काळीजच मुळी थरारून गेले. मिट्ट काळोखात सुर्याने आपले तेज प्रगट केले. कडक शब्दात त्यांनी सैन्याची हजेरी घेतली. ” अरे तूमचा बाप इथे मरून पडला आहे, अन् तूम्ही नामर्दासारखे पळून चालला आहात ? आऊ साहेब काय म्हणतील ? मागे फिरा ! मी तो दोर केव्हाच कापून काढला आहे. एकतर कड्या खालते उड्या मारून जीव द्या, नाही तर वैर्याचा जीव घ्या !” आणी काय आश्चर्य ? सुर्याजी रावांनी फुटलेले धरण सावरले. मराठ्यांनी कडोविकरोळीचे रण मांडले आणि सिंहगड जिंकला. महाराजांचा अन् आऊसाहेबांचा लाडका सिंहगड. जिथे उमरठ्याच्या तानाजी राव सुभेदारांनी आपले रक्त सांडले व जीव अर्पण केला. तीर्थक्षेत्र सिंहगड ! जिथे आपले अभागे हिंदू प्रेयसीच्या गळ्यात मिठ्या घालून बसतात. जिथे दारूच्या अड्याची मैफल अन् जुगाराचा फड सजतो. जिथे रेव्ह पार्टिची बदफैली साजरी होते. आमच्या अधःपतनाची सुद्धा कमाल आहे ! तीर्थक्षेत्राचे मोल आम्ही कधी जाणलेच नाही.
माघ वद्य नवमी – दास नवमी
संत रामदास स्वामींनी सज्जनगडावर समाधी घेतली.
९ फेब्रुवारी १६८९
औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने छत्रपती संभाजीमहाराजांना कैद केल्यानंतर रायगडच्या किल्ल्यावर महाराणी येसूबाई व किल्ल्यावरील मराठे सरदारांच्या सल्ल्याने राजाराम- महाराजांनी मंचकारोहण केले.
९ फेब्रुवारी १६६५
शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे ‘बसनूर’ छापा घालून लूटले. महाराजांनी बसनूरवरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली. राजाने नौकाप्रवास करून सागर उलंघू नये ही हिंदू धर्मातील खूळचट रूढी उडवून लावली. शिवराय किंवा सावरकर काय ! दोघेही हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव गाणारे होते, पण धर्मातील खूळचट रूढींना दोघांनिही आपल्या चरित्रात मूळीच थारा दिला नाही.
१० फेब्रुवारी १६७१
सिद्दी कासीमने आणि सिद्दी खैरात यांनी दंडा राजपूरी मराठ्यांकडून जिंकून घेतली. या दिवशी होळी पौर्णिमा होती.
महाशिवरात्र – प्रताप राव गुजर पुण्यतिथी
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणास धर्मवाट दिली.महाराजांना ही बातमी समजताच.त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले -
“बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. भावनेत बाव भरून केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका. सेनापती विवेकशून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाईच ठरतो राव ! शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसव्या मुत्सद्देगिरीचा मुखवटा चढवू नका बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.”
तोच सल मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर जगत होते. अन् एक दिवस उगवला – बळीचा दिवस. (दि.२४ फेब्रुवारी १६७४) या दिवशी महाशिवरात्र होती. प्रताप राव गुजर आपल्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बहलोल खान ४०,००० फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतीचा मुजरा झडणार नव्हता ! का ? तर “बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.” असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता. बहलोल खानाच नाव ऐकून अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. रावांच्या डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या. विजेच्या चपळाईने प्रताप रावांनी घोड्यावर मांड टाकली व घोड्याला टाच मारली. ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले. फक्त सात. फक्त सात. सात घोडेस्वारांची मात चालली होती काळावर. जणू सुर्यरथाचे सात अश्वच पृथ्वी गिळंकृत करण्या करता सुसाट वेगाने निघालेले होते. बहलोल खानाने घटप्रभा नदी ओलांडली. नदी ओलांडल्यावर त्याला व त्याच्या फौजेला अपरंपार आनंद झाला. कारण ते आता शिवाजीच्या मुलखात घुसत होते. शिवाजीच्या मुलखात त्यांच्या घोड्याची टाप पडत होती. त्याचे नगारे वाजत होते. कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे आघाडीला फडकत होते. उंटांचा व घोड्यांचा रिसाला दोन बाजूंनी दौडत सुटला होता. स्वतः बहलोल खान हत्तीवर बसला होता. आपल्या फौजेला जोश देत होता.
अन् अचानक प्रतापराव बहलोल खानावर तुटून पडले, आपल्या ६ जणांच्या “प्रचंड सैन्यानिशी.”
“इंद्रधनू विस्कटले ग्रासत, रंग उधळले नभा, सात रंग उधळले दिगंती, प्रलयभैरवी प्रभा, विलयंकर उस्कटल्या रेषा मोक्षदायिनींच्या, तुफान उठले मनात जैसे सात समुद्रांच्या, खलनिर्दालन देव कार्य ! मग कसला त्यास उशीर ? अधीर वेडे वीर निघाले सात शिवाचे तीर ! सात शिवाचे तीर !!!
रावांनी नेसरी येथे अवघ्या सहा शिलेदारांनिशी बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणी प्राणार्पण केले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली. नेसरीचे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले.
१३ फेब्रुवारी १६६०
शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस ‘गिफर्ड’ व त्याचा माल सोडून दिला.
१७ फेब्रुवारी १७७३
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी जिजाबाई (करवीर)यांचे पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर)येथे निधन
१७ फेब्रुवारी १७७४
नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर रघुनाथराव हे पेशवे झाले
२१ फेब्रुवारी १६६५ (रात्री)
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत शिवाजी महाराज छापा घालणार असल्याची खबर. इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ला भर रस्त्यावर ठार मारले होते कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
२२ व २३ फेब्रुवारी १६६५
शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली.
२४ फेब्रुवारी १६६५
मग मात्र शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, ” आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !” नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस “तिथीने” साजरा झालेला होता.
२४ फेब्रुवारी १६७०
छत्रपति शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी “सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब” यांना पुत्र लाभ झाला,”रामराजे” नाव ठेवण्यात आले,रामराजे पालथे उपजले,राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले… राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले. “रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालतील.”
२४ फ़ेब्रुवारी १६७० राजगड येथे शिवबा राजेंच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांच्या पोटी राजाराम यांचा जन्म .
२४ फ़ेब्रुवारी १८१२
पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग
२४ फ़ेब्रुवारी १६७४
प्रतापराव गुजर यांना नेसरी येथे वीरमरण (वेडात मराठे वीर दौडले सात)

No comments:
Post a Comment